पुणे : काेणी काहीही म्हणाे, दावाेसमधून राज्यात माेठी गुंतवणूक आली आहे असा टाेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही व्यासपीठावर हाेते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री बाेलत हाेते. ते म्हणाले, मी नुकताच दावाेस येथे जाऊन आलाे. तेथून माेठी गुंतवणूक आली. शरद पवार अनुभवी आहेत. त्यांना माहित आहे गुंतवणूक कशाप्रकारे महत्वाची आहे. त्यामुळे काेणी काही बाेलाे परंतु राज्यामध्ये माेठी गुंतवणूक आली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दावाेसमध्ये परदेशातील नव्हे तर हैदराबादमधील उद्याेजकांनी गुंतवणूक केली, अशी टीका केली हाेती. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता सुळे यांना प्रत्युत्तर दिले.
