सुसंस्कृत महाराष्ट्राला मान खाली लावणारी घटना आज सांगली येथे भर सभेत घडली. महिलांचीही उपस्थिती असलेल्या या सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चक्क ‘भ’च्या बाराखडीतील शिवी जाहीरपणे दिली.
सांगली येथे राऊत यांच्या सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी बाेलताना राऊत म्हणाले निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची. शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का भोXXXच्या !” धक्कादायक म्हणजे या विधानावर अनेकांनी चित्कार केले. मात्र उपस्थित महिलांची मान मात्र शरमेने खाली गेली.महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा दाखला येता-जाता देणारे संजय राऊत यांचे ‘पालक’ शरद पवार यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करणार असा सवाल यावरून केला जात आहे.एका बाजुला लाेकशाही व्यवस्थेवर बाेलायचे आणि त्याच लाेकशाही व्यवस्थेचा एक स्तंभ असलेल्या निवडणूक आयाेगासारख्या घटनात्मक संस्थेला शिवीागाळ करायची हा दुट्टपीपणा असल्याची टीका साेशल मीडियावरून हाेत आहे.
