आमच्या घराण्याचे आम्हांला पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आता महाराष्ट्रात कोणीही संजय राऊत यांच्या वक्तव्याला फार महत्व देत नाही असे प्रत्युत्तर आमदार शिवेंद्रराजे भाेसले यांनी राऊतांच्या टीकेवर दिले आहे.
साता-यातील सुरुची बंगला येथे माध्यमांशी बाेलताना राजेंनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला.शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी साता-यातील शाहू कला मंदिर सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संजय राऊतांनी आमदार शिवेंद्रराजे आणि राजघराण्यावर बाेचरी टीका केली.
या टीकेस आज आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी प्रत्युत्तर दिले. छत्रपतींच्या घराण्याबद्दल जर आदर होता तर युवराज संभाजीराजे छत्रपती यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही असा सवाल शिवेंद्रराजेंनी केला. खासदार संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले गेले.आमच्या घराण्याचे आम्हांला पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आता महाराष्ट्रात कोणीही संजय राऊत यांच्या वक्तव्याचा फार महत्व देत नाही असेही शिवेंद्रराजेंनी नमूद केले.
