पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा; तर मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीची शक्यता

राज्यात पुढील 5 दिवस विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त वर्तवला आहे. या सर्वाधिक फटका विदर्भाला बसणार असून विदर्भातील काही भागांत गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. वीजा लखलखताना शक्यतो बाहेरची कामे टाळा किंवा योग्य निवारा बघा असे आवाहन करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

आधीच बदलतं वातावरण आणि अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. अशातच पुन्हा आणखी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे 26 एप्रिल आणि 27 एप्रिलला पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता आहे.

विदर्भात मात्र या पाच दिवसात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील पाच दिवस किमान तापमान चार डिग्रीने तर कमाल तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर पुढील पाच दिवस राज्यात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.

राज्यात काही भागात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांसह रब्बी पिकांचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामध्ये आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.