काही लोक सकाळी ९ वाजता नशा करून कुस्ती खेळतात – देवेंद्र फडणवीस

अहमदनगर येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेच्या समारोपला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची उपस्थिती होती. यावेळी फडणवीस यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. ‘काही लोक सकाळी नशा करून कुस्ती खेळतात, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता संजय राऊत यांचा समाचार घेतला.अहमदनगर येथील कुस्ती स्पर्धेचा मानकरी पैलवान महेंद्र गायकवाड हा ठरला. अंतिम कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये लढत होत असताना शिवराज राक्षे यांच्या पायाला इजा झाल्याने महेंद्र गायकवाड याला विजयी घोषित करण्यात आले.

अहमदनगर येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेच्या समारोपला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची उपस्थिती होती. यावेळी फडणवीस यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. ‘काही लोक सकाळी नशा करून कुस्ती खेळतात, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता संजय राऊत यांचा समाचार घेतला.

‘आमच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये सकाळी नऊ वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीच्या बाहेरच राहावं लागतं. जे असली मातीचे पैलवान असतात, तेच कुस्त्या जिंकतात. तुमच्या आशीर्वादाने आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे. 2024 ला पुन्हा जिंकू, तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या, असे देवेद्र फडणवीस पुढे म्हणाले.