नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला – अजित पवार

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “नाना पटोलेंनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता राजीनामा दिला. तसेच राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली,” असा आरोप अजित पवारांनी केला. त्यानंतरही ते पद रिक्त ठेवणे आमची चूक झाली अशी कबुली ही अजित पवारांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

तसेच निकालाने पक्षांतरबंदी कायद्याला काय अर्थ राहणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. याआधीही बहुमत असल्याने कुठलीही अडचण येत नव्हती. सगळ्याच राजकीय पक्षांना संविधानाने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा आदर करून जनतेचा अपमान होता कामा नये, स्थिरता लाभली पाहिजे असं पाऊल उचलले पाहिजे. कुठलाही निकाल लागला असता तरी सरकारवर परिणाम होणार नव्हता. त्यांच्याकडे बहुमत होते, १६ आमदार अपात्र झाले असते तरी सरकार टिकले असते असं अजित पवारांनी सांगितले.

बहुमत असताना सरकार चालत होते. पण आता खीळ बसली आहे. सगळ्या राजकीय पक्षांना संविधानने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तर त्यातून जनतेचा अपमान होता कामा नये. यातून कुठला ही निकाल लागला असता तर सरकारवर परिणाम होणार नव्हता. कारण त्यांच्याकडे बहुमत होतं. तेव्हाचे विधानसभेचे अध्यक्ष यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. पण तो राजीनामा द्यायला नको होता. आमच्या सगळ्यांकडून माहविकास आघाडीकडून तयारी केली असती तर विधानसभा अध्यक्ष आमचा बसला असता. असे देखील अजित पवारांनी सांगितले.