लोकशाहीमध्ये कावीळ झाल्यासारखे वागणे अत्यंत अयोग्य आहे. मोदीजींना विरोध करण्याचा ज्वर चढलेल्यांच्या पोटात दुखते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, नवीन संसद भवन देशाची शान आणि ताकद आहे. मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनाला जात नाहीत. ते कारणे सांगतात ते हास्यास्पद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवीन संसद भवन उभारण्याची चर्चा होती. मात्र हे त्यांना जमले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाची उभारणी केली. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे अशी टीका फडणवीस यांनी केली.
