आश्वासनपूर्ती, शेतकऱ्यांना मिळणार केंद्र आणि राज्याचे मिळून बारा हजार

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली आहे. नमो शेतकरी योजना राबविण्याच्या निर्णयास मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारे सहा हजार रुपयांची योजना आता राज्य सरकार स्वतंत्ररित्या राबवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्राचे सहा आणि राज्याचे सहा असे एकूण १२ हजार रुपये मिळणार आहे. तसेच पिकविम्याचे सर्वच पैसे सरकार भरणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकरी सन्मान योजना केंद्र सरकार राबवते. त्यात शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये केंद्र सरकार जमा करते. त्याच पद्धतीने राज्य सरकारही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देणार आहे. त्यासोबतच पीक विम्याचा हप्ता शेतकरी भरत होते त्याचा हिस्सा सरकार भरणार आहे. शेतकरी फक्त पीक विम्याचा एक रुपया भरणार आहे.