सगळ्या पक्षांनी मिळून एकत्रित योगाभ्यास केला तर विधानमंडळाचे कामकाज सुरळीत चालेल. अध्यक्षांना फार त्रास होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विधानमंडळ परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकाऱ्यांसमवेत योगाभ्यास केला. यावेळी फडणवीस म्हणाले,जगातील सर्व बंधू-भगिनींना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देतो.विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योगाभ्यासाकरता आम्हा सर्वांना विधान मंडळात निमंत्रित केले होते. विधान मंडळात आम्ही सकाळी योगाभ्यास केला. असाच योगाभ्यास सगळ्या पक्षांनी मिळून एकत्रित केला तर विधानमंडळाचे कामकाज सुरळीत चालेल. अध्यक्षांना फार त्रास होणार नाही .
