शिवजयंतीच्या दिवशी छत्रपति शिवाजी महाराजांचा पोवाडा गायल्यामुळे शाहीर मावळे यांना अटक



आज महाराष्ट्रात एक संतापजनक प्रकार घडला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई करून गड-किल्ल्यांवर जमावबंदीचे (कलम १४४) आदेश काढणार्‍या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने आता छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारे पोवाडे सादर करण्याविरोधात सविनय कायदेभंग करणाऱ्या शाहीर हेमंतराजे मावळे यांना पुण्यातील लाल महालाजवळ अटक केली आहे. या अटकेचा निषेध करत ‘पोवाड्यांवर बंदी घालणे म्हणजे ठाकरे सरकारच्या काळात राज्यात मोगलाई आली आहे का?” असा सवाल शाहीर हेमंतराज मावळे यांनी केला आहे.

याविषयी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध व्यक्त करत म्हटले आहे कि, “महाविकास आघाडी सरकारच्या मोगलाईचा आणखी एक संतापजनक प्रकार! शिवजयंतीला शिवगौरवाचे पोवाडे नाही गायचे तर काय करायचे? शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या अटकेचा तीव्र निषेध!” महाराष्ट्र सरकार द्वारे आधी अजान स्पर्धा सुरु करणे, त्यानंतर सर्व मोर्च्यांना परवानगी देत शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर बंदी लावणे असे प्रकार घडत असल्यामुळे राज्याची जनता नाराज झाली आहे.


हेमंतराजे मावळे म्हणतात,”शिवजयंतीला पोवाडा नसणं म्हणजे आत्म्याशिवाय शरीर. शिवजयंतीचा आत्माच सरकारने कडून घेतला याचा आम्ही निषेध केला आणि पोवाडे गायले म्हणून आम्हाला अटक करण्यात आली. याबाबत आम्ही निदर्शनेही केली मात्र तरीही सरकारला जाग आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या आणि छत्रपतींना आपलं दैवत मानणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. मात्र आता त्यांच्या मुलाकडे सत्ता असताना राज्यात छत्रपतींच्या जयंतीदिनी उत्सवाला मनाई करणं अत्यंत दुर्दैवी आणि कर्मदरिद्रीपणाचे आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री गंभीर गुन्हे करून बाहेर फिरत आहेत मात्र माझ्यासारख्या व्यक्तीला पोवाडे गायले म्हणून अटक होते. या गोष्टीचा महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने निषेध करावा आणि मुख्यमंत्र्यांना जागं करावं.” असे आवाहन शाहीर हेमंतराजे यांनी शिवप्रेमींना केले.

महाराष्ट्र सरकारने ११ फेब्रुवारी रोजी एक जीआर काढत शिवजयंती दिनी पोवाडे गायनाचे कुठलेही कार्यक्रम केले जाणार नाही, अशी सूचना दिली होती. सरकारच्या मते शाहीर हेमंतराजे यांनी सविनय कायदा भंग केला असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र छत्रपति शिवाजी महाराजांच्या राज्यात असे होणे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न जनता उपस्थित करते आहे. याविषयी पुढे काय होणार हे बघणे महत्वाचे ठरेल.