महाराष्ट्रात लागणार का ३ आठवड्यांचे लॉकडाउन ?



महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाची परिस्थिती बघता, राज्यात ३ आठवड्यांचे कडक लॉकडाउन लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस नेता आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे कि, महाराष्ट्राच्या जनतेचा जीव वाचवण्यासाठी कदाचित हा निर्णय घ्यावा लागेल. त्यांनी केंद्र सरकार वर देखील आरोप लावले आहेत. त्यांचे म्हणणे आहे कि, अशा कठीण परिस्थितीतही केंद्र सरकार गुजरात राज्याला अधिक व्हॅक्सीन पाठवतंय आणि महाराष्ट्राकडे काणाडोळा करंतय.

विरोधी पक्षातर्फे त्यांच्या या वक्तव्याचे खंडण करण्यात आले आहे. तसेच विरोधी पक्षाने म्हटले आहे कि, राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास असमर्थ ठरली आहे. राज्याचे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वाभाडे निघताएत, अशा परिस्थितीत राज्य सरकारने व्हॅक्सीन वरून राजकारण करू नये आणि परिस्थिती कशी हाताळता येईल याकडे लक्ष द्यावे.


मात्र हे सर्व होत असताना, आता राज्याची जनता पुन्हा एकदा लॉकडाउन सहन करू शकेल का ? राज्याच्या उद्योग धंध्यांचे, छोट्या व्यवसायांचे पहिल्या लॉकडाउनमुळे अक्षरश: बारा वाजले होते. अर्थव्यवस्था कोलमडली आहे, अशा परिस्थितीत अधिकाधिक टेस्टिंग, योग्य आरोग्य व्यवस्था, आणि जनतेद्वारे सांमजस्य अशा सर्व गोष्टींची एकत्र आवश्यकता आहे. लॉकडाउन या सर्व परिस्थिचे उत्तर असू शकते का ? असा प्रश्न इथे निर्माण झाला आहे. एकदा विचार करून बघा भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा सहभाग देणारी फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्रात आहे, यामुळे अनेक लोकांची घरं चालतात. असं असताना हा लॉकडाउन किती लोकांसाठी कर्दन काळ बनून येईल, माहीत नाही.

त्यामुळे महाराष्ट्रात आता पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.