
महाराष्ट्रात सध्या कोरोनाची परिस्थिती अतिशय भयंकर झालेली आहे. रुग्णालयात बेड्स न मिळणे, रेमडेसीवीर न मिळणे, अगदी कोरोनाचे औषध म्हणून ओळखले जाणारे फेबी फ्लू देखील बाजारातून गायब होणे असे प्रकार महाराष्ट्रात घडताना दिसून येत आहे. असे असताना विरोधी पक्षाने रेमडेसीवीर वरुन राजकारण करु नका, असे सत्तापक्षाला सांगितलेले आहे. नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले कि, “भारतीय जनता पक्षाने स्वत:साठी रेमडेसीवीरची मागणी केली नव्हती, आम्ही रेमडेसीवीरची कमी झाल्याने ते मिळवण्यच्या प्रयत्नात आहोत, हे आम्ही आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी करत आहोत, आणि म्हणूनच आम्ही मंत्र्यांसोबत याविषयी बैठका घेत आहोत. ब्रुक फार्मा कंपनीज कडे जर भरपूर साठा असेल तर त्याचे पुरावे द्या, कोऱ्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही.” असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
त्याचे झाले असे, कि राज्याचे शेजारी केंद्र शासित प्रदेश दमन येथे रेमडेसीवीर मिळवण्यासाठी एका फार्मा कंपनीशी विरोधी पक्षाने संपर्क साधला होता, मात्र नंतर त्या फार्मा कंपनीच्या मालकांना राज्य सरकारतर्फे धमक्या मिळाल्या असल्याच्या बातम्या समोर आल्या. यावरच आपली प्रतिक्रिया देत फडणवीस यांनी वरील विधान केले.
महाराष्ट्रात सध्या आणिबाणि सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मृतांच्या संख्येत वाढ, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, असे सगळे असताना, राज्य सरकारने रेमडेसीवीर या औषधावरुन राजकारण करु नये, अशी इच्छा विरोधी पक्षाने व्यक्त केली तसेच, सरकार या संदर्भात भरपूर काही करू शकत होती, मात्र संपर्क विरोधी पक्षाने साधला आणि रेमडेसीवीर मिळवण्याचा प्रयत्न केला, म्हणून सत्तापक्षाला याचा त्रास झाला, असे विरोधी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
एकूणच कसोटीच्या काळात सत्तारुढ पक्षाने कसे वागू नये याचे उदाहरण महाराष्ट्र सरकारने प्रदर्शित केले आहे. महाराष्ट्रात खासकरुन पुण्या मुंबईकडे कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. आरोग्य व्यवस्था ढासळत चाललेली आहे. अशा परिस्थितीत राजकारण न करता, जनतेच्या हितासाठी जिथूनही मदत मिळतेय तिथून ती घेण्यात यावी, आणि जनतेसाठी उत्तमोत्तम आरोग्य व्यवस्था या सरकारने निर्माण करावी, तसेच त्यात विरोधी पक्षाने सरकारची आणि सरकारने विरोधी पक्षाची साथ द्यावी, अशी सामान्य माणसाची इच्छा आहे.
अखेर आपण नेत्यांना निवडून का देतो ? आपसात भांडण्यासाठी तर नाही ना ? कठईण काळात एकत्र एक होवून जनतेच्या कल्याणासाठी कार्य करण्यासाठी. हो कि नाही ? मग तेच या सरकार आणि विरोधीपक्षाने करावे असे मत सामान्य माणसाचे आहे.
कोरोनाचे हे दुष्टचक्र आता कधी संपणार माहीत नाही, तोवर आपण सगळ्यांनी आपली काळजी घ्या, बाहेर पडू नका, आणि स्वस्थ रहा |
