रेल्वे ने आधी लातूरला पाणी आणि आता महाराष्ट्रात ऑक्सीजन, फडणवीसांनी करून दाखवले…!

महाराष्ट्रात सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, राज्यात ऑक्सिजन सिलेंडर्सचा तुटवडा आहे. ज्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला त्रास भोगावा लागू नये, महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाचे हाल होवू नये, आणि कुणालाही आपला जीव गमवावा लागू नये यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रयत्नात आहेत. त्यांनी लगेच केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी संपर्क साधत महाराष्ट्रात रेल्वे द्वारे ऑक्सिजन सिलेंडर्स पाठवण्याची विनंती केली, आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी त्वरित पावले उचलत ऑक्सिजन सिलेंडर्सची पहिली खेप महाराष्ट्रासाठी पाठविली सुद्धा | आधी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी दुष्काळी भाग लातूर येथे रेल्वेने पाणी पोहोचविल्याचा पराक्रम करून दाखवला होता, आता महाराष्ट्रात आणिबाणिसदृश्य परिस्थिती असताना पुन्हा एकदा फडणवीस धावून आले आहेत.



महाराष्ट्रात ऑक्सिजन सिलेंडर्सचा तुटवडा निर्माण झाल्यावर बाहेरून ऑक्सिजन मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सिलेंडर्स बाय रोड येत असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात पोहोचायला वेळ लागत होता, आणि त्यामुळे अनेक नागरिकांपर्यंत वेळेत ऑक्सिजन पोहोचत नव्हती, यावर तोडगा काढत पुन्हा एकदा रेल्वेचा हात धरण्याचा प्रयत्न विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी केला. आणि गोयल यांनी त्यांना साथ देखील दिली. लगेच पहिली खेप रेल्वेने महाराष्ट्रात पाठवण्यात आली. 


याआधी फडणवीस यांच्यावर रेमडेसीवीर इंजेक्शन संबंधी काही आरोप करण्यात आले होते. फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत सांगितले कि, रेमडेसीवीर हे महाराष्ट्रासाठी मागवण्यात आले आहेत, भाजपसाठी नाही. आणि त्यानंतर खरंच महाराष्ट्रात सामान्य जनतेसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात आला. सत्तापक्षाला हे पचनी पडायला जरा कठीण गेले, कि जे काम त्यांनी करणे अपेक्षित होते, ते एक विरोधीपक्ष नेता करतोय.

सामान्य माणसाच्या मनात देखील हाच प्रश्न आज उपस्थित होतो आहे. जे काम सत्तापक्षाने करायला हवं, ते आज विरोधी पक्ष करतंय. सत्तापक्षाला देखील विविध उपाय शोधून मार्ग काढून महाराष्ट्राला या परिस्थितीतून बाहेर काढणं शक्य आहे. त्यांच्या हातात सिस्टिम आहे, ते अनेक गोष्टी करू शकतात. मात्र ते का करत नाहीयेत, किंवा “आउटऑफ द बॉक्स” विचार करून ते का जनतेची मदत करत नाहीयेत? असा प्रश्न मात्र आज इथे निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात आरोग्य विभाग पूर्णपणे ढासळण्याच्या मार्गावर आहे. डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ कमी पडताएत, हॉस्पिटल्समध्ये बेड्स नाहीयेत, अनेक डॉक्टर्स स्वत: कोरोनामुळे दगावताएत, अशा परिस्थितीत विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम केले पाहिजे. आपसातील मतभेद बाजूला ठेवून जनहितार्थ काम केले पाहिजे, तसे झाल्यासच महाराष्ट्र या गर्तातून बाहेर पडू शकेल.