महाराष्ट्रात युवांना नक्की कधीपासून मिळणार लस?



केंद्र सरकारच्या निर्णयानुसार काल पासून संपूर्ण देशात १८ वर्षांच्या वरील वयोगटासाठी लसीकरणाचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. आपण बघितलं कि आपण कोविन वेबसाइट आणि आरोग्य सेतु किंवा उमंग एपच्या माध्यमातून कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतो. मात्र महाराष्ट्रातील तरुणांना या रजिस्ट्रेशनचा फायदा तरी काय जर त्यांना लस मिळणार नसेल ? असे आम्ही नाही महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री म्हणत आहेत. राज्य सरकारतर्फे सांगण्यात येत आहे, कि राज्याकडे पुरेशा लसी नाहियेत. त्यामुळे १ मे पासून १८ वर्षांच्या वरील वयोगटाला त्यांना लस देता येणार नाही, तसेच ती त्यांना कधीपासून देता येईल, याबद्दल देखील त्यांना ठाम माहिती देता येणार नाही. असे असताना राज्यातील तरुणांनी काय करावे ? असा प्रश्न इथे निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारने नुकताच निर्णय घेतला कि १ मे २०२१ पासून संपूर्ण देशात १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना देखील आता लस घेता येणार आहे. त्यासाठी त्यांना आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्याप्रमाणे २८ एप्रिल पासून रजिस्ट्रेशन सुरु देखील झाले, मात्र आता महाराष्ट्र राज्य सरकार असे म्हणतेय कि त्यांच्याकडे पुरेशा लसी नाहीत ? तसे असल्यास राज्य सरकारचे काय नियोजन असेल, हे देखील त्यांनी स्पष्ट केले नाही. अशा परिस्थितीत राज्यातील तरुणांनी विना लस घेता रहायचे का ? किंवा लस घ्यायची असेल तर कुणाकडे जायचे ?

मुख्यमंत्र्यांनी लसीकरणाचे योग्य नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. आणि लवकरात लवकर युवांसाठी लसीकरणाची व्यवस्था करू असे देखील म्हटले आहे. एकूणच महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक आहे. येत्याकाळात लसीकरणावर भरपूर जोर देणे आवश्यक आहे. तोच एक मार्ग आहे, महाराष्ट्राला यातून बाहेर काढण्याचा.