महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हळू हळू रुळावर येत आहे. मात्र या सगळ्यात अचानक राज्य सरकारने एक निर्णय घेतला. आणि महाराष्ट्रात खळबळ माजली. तो निर्णय म्हणजे “होम आयसोलेशन” बंद करण्याचा. हा एक धक्कादायक निर्णय आहे. मात्र या मागचं कारण काय? काय विचार करून राज्य सरकारने हा असा निर्णय घेतला आहे ? असा प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केला आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत, होम आयसोलेशन का बंद करण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला. तसेच “असे निर्णय चर्चा करून घेण्यात यावे.” असे देखील ते यावेळी म्हणाले.

यामागे राज्यसरकारने दिलेले लॉजिक असे आहे कि, कोरोनाचा प्रादर्भाव कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मतानुसार होम आयसोलेशन मध्ये असताना लोक घरात न राहता इथे तिथे फिरतात आणि त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून होम आयोसेलशन बंद करण्यात आले आहे.
मात्र हा विचार एकांगी आहे असे अनेक लोकांचे मत आहे. होम आयसोलेशन बंद केल्याने रुग्णावर अधिक मानसिक ताण पडेल आणि त्यामुळे त्याची तब्येत आणखी खराब होईल. होम आयोलेशन बंद करण्याचे काही प्रमुख तोटे :
१. पहिल्यांदी तर होम आयसोलेशन जे शिस्तीत पाळत आहत, त्यांच्यावर हा अन्याय आहे. त्यांना विनाकारण त्यांच्या परिवारापासून दूर रहावे लागणार.
२. आपल्या घरात आपल्याला अधिक सुरक्षित वाटतं, त्यामुळे अधिक लक्षणं नसल्यास घरीच राहून ठीक होता येईल, आपल्या परिवाराच्या डोळ्यांसमोर राहू, त्यांच्या जवळ राहू तर लवकर बरे होऊ अशी भावना रुग्णांच्या मनात असते जी त्यांना मानसिक बळ देते, त्यामुळे होम आयसोलेशन बंद केल्यास याचा मानसिक त्रास रुग्णांना होऊन त्यांच्या तब्येतीवर याचा अधिक परिणाम होवू शकतो.
३. यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण येईल. महाराष्ट्रात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लोक घरी राहून ठीक होत होते, जर प्रत्येकालाच क्वारंटाइन सेंटर मध्ये पाठवण्यात आले, तर इतकी मोठी तयारी कशी करायची, त्यासाठी इंफ्रास्ट्रक्चर पाहिजे, व्यवस्था पाहिजे, लोक पाहिजे ते शासनाला जमणार आहे का ?
एकूणच होम आयसोलेशन रद्द करणे एक खूप मोठा त्रासदायक निर्णय सिद्ध होऊ शकतो. क्वारंटाइन सेंटर्सची काय परिस्थिती होती, तिथे महिलांसोबत मुलींसोबत अत्याचार देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत, असे असताना राज्य सरकारने हा अविचारी निर्णय का घेतला या बाबत मात्र कुणी काहीच सांगू शकत नाहीये.
