राज्यात अनलॉक बाबत गोंधळच गोंधळ



महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हळू हळू आटोक्यात येत आहे. हळू हळू केसेस कमी होणं, मृत्युदर कमी होणं अस सुरु आहे. असे असताना राज्य आता अनलॉकच्या दिशेने जात असल्याने पुढील प्रक्रिया काय असेल आणि अनलॉकचे नियोजन कसे करता येईल याविषयी जनतेच्या मनात उत्सुकता आहे. मात्र राज्य सरकार आणि सरकारमधील मंत्री आपापल्या वेगवेगळ्या विधानांनी जनतेची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे.  राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉक संबंधातील नियमाबद्दल प्रेसनोट काढत माहिती दिली होती. मात्र त्यांच्या या प्रेसनोटनंतर राज्यसरकारने राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, असे जहीर केले आहे. यामुळे राज्यात गोंधळ झालेला आहे.

राज्य सरकारने लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली होती. मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारच्या माहिती विभागाकडून एक प्रेसनोट जारी करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे.

आता प्रेसवार्ता घेणारे मंत्री आणि सरकारमध्ये निर्णय घेत असलेले मंत्री यांच्यात सामंजस्य नाही असे या घटनेतून स्पष्ट झाले. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला. या सर्व परिस्थितीत सामान्य जनतेने काय करायचे ? नेमके निब्रंध काढले आहेत कि नाही, आहेत तर राज्याच्या कुठल्या भागात काढले आहेत ? असे प्रश्न सरकारला विचारणे आता आवश्यक झाले आहे.


वडेट्टीवार काय म्हणाले ?

राज्य सरकारने लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले.

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

एकूणच सरकार कन्फ्यूज आहे, जनता कन्फ्यूज आहे आणि पुढे काय होणार हे कोणाचच कोणालाच काहीच कळत नाहीये. राज्यात लॉकडाउन बाबत गोंधळ होता, आता अनलॉक बाबत सुद्धा गोंधळ आहे. अशाने सामान्य माणसाने पुढे काय करायचे हे देवालाच ठाऊक.