राज्यात गुन्हेगारी वर वचक ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले पाहिजे : फडणवीस


“लॉकडाउनच्या काळात देखील राज्यात १४% गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील पोलिसांचे काम आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था लागू करणे, शिस्तीने काम करणे मात्र त्यांच्या या कामात कुणाला मारहाण होता कामा नये. राज्यात गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले पाहिजे.” असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते नुकतेच नागपुर येथे ‘मनोजव ठवकर’ या व्यक्तिच्या घरी भेट देण्यास गेले असता, त्यांनी हे विधान केले. पोलिसांच्या कारवाईत झालेल्या मारहाणीत मनोज यांचा मृत्यु झाला, त्यानिमित्ताने फडणवीस त्यांच्या घरी भेट देण्यास गेले असता त्यांनी हे विधान केले.

सगळ्यात भयंकर म्हणजे केवळ ‘मास्क घातला नाही’ या कराणाने ही मारहाण करण्यात आली, मनोज दिव्यांग होते, आणि त्यामुळे या मारहाणीचा त्यांच्यावर अधिक असर झाला, त्यांना रुग्णालयात नेत्यानंतर मृत घोषित करण्यात आले. अतिशय निर्दयी असा हा प्रकार नागपुर येथे घडला. हा मृत्यु नव्हे तर ही हत्या आहे, असेच मत नागपुरकरांचे आहे.



“पोलिस विभागात शिस्त असलीच पाहिजे. जे गुन्हे चालान करण्याचे आहेत, तेथे मारहाणीसारखे प्रकार होता कामा नये! लॉकडाऊनच्या काळात सुद्धा राज्यात 14% गुन्हे वाढले आहेत. गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले पाहिजे.” असेही ते यावेळी म्हणाले सोबतच ते म्हणाले कि, “या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करूच. पण, भारतीय जनता पार्टीच्या वतीने तातडीची 2 लाख रुपये मदत आम्ही देणार आहोत.”


नागपुर येथे पोलिसांच्या झालेल्या मारहाणीत मनोज यांचा मृत्यु झाला. मनोज हे घरातील कमवते असल्याने त्यांच्या कुटुंबासमोर आता अनेक आर्थिक प्रश्नही उभे राहिले आहेत. पोलिस हे नागरिकांची रक्षा करण्यासाठी असतात. इतर देशांमध्ये पोलिसांना बघितले कि नागरिकांना आधार मिळतो, मात्र आपल्याकडे पोलिसांना बघितले कि लोकांना भिती वाटायला लागते. असे होता कामा नये. पोलिसांच्या मारहाणीत मनोज यांचा मृत्ु व्हावा ही किती दुर्दैवाची बाब आहे.

या प्रकरणातील दोषींवर त्वरित कार्यवाही व्हावी तसेच केवळ बदली नाही, तर त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी यावेळी फडणवीस यांनी केली आहे.