
मनसुख हिरेन हे नाव ऐकलं, कि आपल्या डोळ्यांसमोर महाराष्ट्रात घडलेली चित्तरकथा जशीचा तशी उभी राहते. अचानक परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचे चेहरे डोळांसमोर झळकतात, आणि मग अनिल देशमुख यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण हे सर्व प्रकरण मनसुख हिरेन या माणसाच्या हत्येमुळे उघडकीस आले. आणि हाती आलेल्या माहितीनुसार मनसुखच्या हत्येसाठी तब्बल 45 लाख रुपये आरोपींच्या खात्यात जमा करण्यात आले होते, मात्र इतकी मोठी रक्कम कुणी आणि कशी जमा केली याबाबत सध्या तपास सुरु आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए ने मुंबई सत्रन्यायालयात दिलेल्या माहितीनुसार मनसुख हिरेनच्या हत्येसाठी 45 लाख रुपये आरोपींना देण्यात आले होते. मात्र ही रक्कम कुणी दिली, याची माहिती अद्याप मिळालेली नाही, आणि या संदर्भात सध्या तपास सुरु आहे. पुढच्या माहितीच्या तपासासाठी एनआयए ने कोर्टाकडे 30 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. याआधी कोर्टाने एनआयएला 2 महीन्यांची मुदतवाढ दिली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरण हे एक अतिशय गंभीर स्वरूपाचे प्रकरण आहे, आणि यातील सुमारे 80 टक्के माहिती अद्याप बाहेर आलेली नाही, असा जाणकारांचा अंदाज आहे. आपण विचार करून बघा, एटांलिया समोर एक गाडी सापडते, त्यात विस्फोटके असण्याची माहिती मिळाली, त्यानंतर एक एक करून मोठी नावे समोर येत गेली. मग त्यात अगदी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही नाव आले. 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या प्रकरणी.
वरवर पाहता हा मुद्दा चिघळत असलेल्या, काहीच निष्पन्न न होणारा जरी दिसत असला, तरी यामध्ये सरकारमधील खूप मोठ मोठ्या लोकांची नावे असण्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. तसेच आता हे 45 लाख रुपयांचे प्रकरण समोर आल्यानंतर या घटनेत पुढे आणखी काय काय होते. हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
वरवर शांत दिसणारे हे प्रकरण आतून मात्र खूप खोल असल्याचा भास आता होतोय, हे मात्र खरं.
