जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीत ठरला पहिल्या क्रमांकाचा पक्ष…!
राज्यातील सहा जिल्ह्यांच्या पोटनिवडणूकीचा निकाल लागला असून, भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. या पोटनिवडणूकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून पंचायत समित्यांमध्ये अनपेक्षितरित्या इतर व अपक्षांनी सर्वाधिक ३८ जागा जिंकल्या.

राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये ५ ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची आज (६ ऑक्टोबर) मतमोजणी झाली. मिनी विधानसभा समजली जाणारी ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची असल्यानं सर्वांनीच ताकद लावली होती. अखेर नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांचा आणि १४४ पंचायत समितीच्या जागांचा निकाल लागलाय.
डहाणूमध्ये शिवसेना खासदाराच्या मुलाचा पराभव :
डहाणू मध्ये शिवसेनेला धक्का बसला आहे. सेनेच्या खासदार पुत्राचा पराभव झाला असून त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहे. कांग्रेस आणि भाजपमध्ये इथं लढत बघायला मिळाली. भाजपचे उमेदवार पंकज कोरे यांनी ४१२ मतांनी विजय मिळवला.
एकूणच भारतीय जनता पक्ष पुन्हा एक सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
