परमबीर सिंह यांच्यावर दाखल प्रकरणात विशेष सरकारी वकीलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार :


मुंबईचे माची पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यासंदर्भात विशेष सरकारी वकीलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे. ते म्हणाले आहेत कि, हे प्रकरण तपास अधिकारी अतिशय बेजबाबदारपणे हाताळत आहेत, त्यासंदर्भातील कुठलीच माहिती देण्यात येत नाही, ज्याचा फायदा थेट आरोपींना होतो” विशेष सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले आहेत कि, “तपास अधिकाऱ्यांच्या अशा व्यवहारामागे नेमकं काय कारण आहे, हे देखील कळत नाहीये, त्यामुळे एकूणच प्रकरण खूप कठीण होऊन बसलं आहे.”

ठाण्यातील ठाणे नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर परमबीर सिंह यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त एन.टी. कदम, पोलीस निरीक्षक राजकुमार कोठमिरे, माजी एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप सिंह आणि गँगस्टर रवी पुजारी यांच्यासह 28 जणांविरोधात खंडणी घेतल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. 

प्रदीप घरत यांनी म्हटलं की, या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून 30 सप्टेंबर रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ज्याची माहिती सरकारच्या वतीनं तपास अधिकाऱ्यांसोबतच इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येते. 

या प्रकरणाचे तपास अधिकारी बाबासाहेब निकम यांनाही माहीत असल्याचे प्रदीप घरत यांनी म्हटले. तपास अधिकारी निकम यांच्याकडून त्यांना तपासाशी निगडीत कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप प्रदीप घरत यांनी केला. तपास अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्यामुळे या प्रकरणाबाबत काहीच ठोस माहिती नसल्याचे घरत यांनी म्हटले.