
काल पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन झाले, आणि संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून नागरिकांनी आपले दु:ख आणि भावना व्यक्त केल्या, मात्र या सगळ्यात एका श्रद्धांजलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या. त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली देत म्हटले कि, “बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या इतिहासात काही वादग्रस्त मुद्दे आहेत, मात्र ते सांगण्याइतका काही मी जाणकार किंवा इतिहास तज्ज्ञ नाही. कुणीही एखाद्या विषयात आपलं आयुष्य खर्ची केल्यानंतर लोक त्यात उणी काढतातच. असं असलं तरी इतिहासाबद्दल आस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही.”
महाराष्ट्रातून या अशा प्रकारच्या श्रद्धांजली वर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे, तसेच याला श्रद्धांजली म्हणता येणार नाही, असेही नागरिकांचे मत आहे. “बाबासाहेब पुरंदरे यांचाख्या इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या निधनानंतर आपण साधे दोन शब्द आदराचे बोलू शकत नाही का ? महाराष्ट्राने ज्यांना दैवत मानले, त्या शिवऋषींबद्दल त्यांच्या निधनानंतर आपण उणी दुणी काढत असू तर आपलं कतृत्व काय?” अशा आषयाचे अनेक ट्वीट्स आणि लेख सोशल मीडियावर सध्या प्रसिद्ध होत आहे.
एकूणच याआधी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यात आले तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात वाद झाले होते. हा विचारसरणीचा परिणाम आहे, असे देखील लोकांचे मत आहे. बाबासाहेबांनी मांडलेल्या इतिहासावर टीका करण्या एवढे मोठे महाराष्ट्रात तरी अद्याप कुणी जन्माला आले नाही, त्यामुळे अशा पद्धतीच्या श्रद्धांजली मागे देखील एक हेतू असतो, एक विचारसरणी असते हे मात्र आता स्पष्ट झाले आहे.
पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आणि नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
