काल केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांच्यावाहनावर पुणे येथे हल्ला करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले कि, “स्मृति इराणी यांच्यावर झालेला हल्ला भ्याड हल्ला आहे. सत्ता पक्षातील लोकच कायदा आणि सुव्यवस्था ठेवणार नसतील तर ते गंभीर आहे. आमचा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे, मात्र पोलिस काही कारवाई करणार नसतील तर आम्ही चोख उत्तर देऊ.

“राज्यात लोक कायदा हातात घेत आहेत, बेकायदेशीर कृत्य करत आहेत. सत्ताधारी पक्षातील लोकच असे वागू लागले, तर राज्याच कायदा आणि सुव्यवस्था नाही हे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे स्मृति इराणी यांच्यावर केलेला हा हल्ला अतिशय भ्याड आहे. आम्ही देखील त्याला जशास तसे उत्तर देऊ शकतो, मात्र आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. आम्ही पोलिसाांना संधी देत आहोत. मात्र पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, तर आम्हाला सुद्धा जशास तसे उत्तर द्यावे लागेल.” असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.
पुण्यात स्मृति इराणी, अमित शहा यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्या ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, त्या हॉटेलबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. दगडफेकही झाली. यावेळी काही भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने देखील आले.
या कार्यक्रमातही राष्ट्रवादीच्या महिलांनी गोंधळ केल्याची बाब समोर आली आहे, तसेच कार्यक्रम संपल्यानंतर स्मृति इराणी यांच्या वाहनावर अंडी फेकण्याचे कृत्य देखील या लोकांनी केले आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नाराज आहे. आणि एका केंद्रीय मंत्रीसोबत राज्यात असे होणे म्हणजे अतिशय दुर्दैवाची बाब आहे.
यावर फडणवीस यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, कि पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली, तर आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल.
