राऊतांना तुरुंगाबाहेरचं वातावरण मानवत नाही, पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये : शंभूराजे देसाई

संजय राऊत तुरुंगाबाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आणि यावेळेस त्यांच्यावर निशाणा साधला आहे, शंभूराजे देसाई यांनी. “राऊतांना तुरुंगाबाहेरचं वातावरण मानवत नाहीये, त्यांच्यावर पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये.” असे म्हणत देसाई यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. सध्या महाराष्ट्रात कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. अशा परिस्थितीत राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यावरुन संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यावर शंभूराजे देसाई यांनी उत्तर देत राऊतांवर पुनर्निशाणा साधला.



देसाई म्हणाले कि, “राऊतांनी आपलं तोंड आवरावं. त्यांना कर्नाटक सीमावादावर बोलण्याचा काही एक एधिकार नाही. राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिलं जाईल, असं म्हणत देसाई यांनी राऊतांना इशारा दिला आहे.

‘…आम्ही दोन हात करायला तयार’ :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वक्तव्य केल्यास आम्ही दोन हात करायला तयार आहोत, असं देसाई यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक वादावर आम्ही चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. केंद्रानं या प्रकरणात लक्ष घालावं.  संजय राऊत यांची बोलण्याची पद्धत महाराष्ट्र सहन करणार नाही. संजय राऊतांना षंड बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा देसाई यांनी राऊतांना दिला आहे.