भाषण करताना चुकीच्या उल्लेखाबद्दल अजित पवार यांची दिलगिरी

पुणे येथील कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ ऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.याबाबत अजित पवारांनी म्हटले आहे की भाषणावेळी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब या महामानवांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ ऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख झाला. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.


पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलण्याच्या ओघात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्यावरून गिरीश महाजन यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केली होती. त्यांनीही दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली होती. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनवधानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो असे म्हणत गिरीश महाजन यामध्ये राजकारण करू नये असेही म्हटले होते.