महाराष्ट्रच्या राजकारणात सगळी गणित २०१९ साली बदलली. भारतीय जनता पार्टी सोबत असलेली शिवसेना ही राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत गेली आणि सत्तेची समीकरण बदलली. शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली. महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ नंतर सत्ता समीकरण बदलत गेली २०२२ मध्ये शिवसेनेतील एक मोठा गट बाहेर पडला आणि आता महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांवर ओझं झालं का? असा प्रश्न निर्माण होतोय.
शिवसेनेतील एक मोठा गट बाहेर पडला यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही कसे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अश्यातच ठाकरे गटाने संभाजी ब्रिगेड सोबत युती केल्यांनतर आता वंचित बहुजन आघाडी सोबत युती करण्याची शक्यता आहे. या छोट्या पक्षांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे काही नवीन खेळी करू इच्छिता का? हे पाहणे महत्वाचं आहे. का हे त्यांच्यासाठी भविष्यात ओझं होईल कारण येऊ घातलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका आणि जागा वाटपाचा मुद्दा कारण महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना होती. आता मात्र, शिवसेना म्हणजे ठाकरे गटाचं वजन कमी होत आहे. यामुळे राष्ट्रवादी ठाकरे गटाला सोडून नवीन काही प्रयोग प्रयत्न करू शकेल.
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने म्हणजेच शरद पवार हे शिवसेनेसोबत गेले होते. परंतु त्यावेळची शिवसेना आणि आताचा ठाकरे गट यांच्यात मोठी तफावत आहे. आता हा ठाकरे गट राष्ट्रवादीसाठी ओझं होईल का? हा विचार शरद पवार नक्की करतील कारण शरद पवार हे जातीचे राजकारण करतात हे महाराष्ट्राला माहितीये याचा त्यांच्या राजकारणाला कंटाळून अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. आता त्याच शरद पवारांसोबत उद्धव ठाकरे मांडीला-मांडी लावून बसले आहेत. यात उद्धव ठाकरेंचंगी देखील आता अडचण झाल्याचे दिसत आहे. त्यांच्यातील एक गट बाहेर पडला आहे त्यामुळे त्यांचे संख्या बळ कमी झालं आहे. अश्यातच अजित पवार, जितेंद्र आव्हाड आणि राहुल गांधी यांचे वक्तव्य हे ठाकरे गटांच्या तथाकथित विचारधारेच्या विरोधात आहे. आता त्यांची विचारधारा जवळपास संपली आहे. या नेत्यांच्या वक्तव्यांचा विरोध उद्धव ठाकरे यांना करता येत नाहीये या वरून एक लक्षात येते कि महाविकास आघाडीमधील पक्ष एकमेकांवर ओझं झाल्याचं दिसतंय.
