मुंबई : सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी. तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष महिला माेर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांन सुनावले आहे.
उर्फी जावेद प्रकरणात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. यामुळे अवमान केल्या प्रकरणी महिला आयोगाने वाघ यांना नोटीस पाठविली आहे. राज्य महिला आयोग स्वतंत्रपणे काम करतो. असं असताना राज्य महिला आयोगाची प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन चित्रा वाघ यांनी केले आहे. त्या कारणाने त्यांना नोटीस पाठवली आहे. चित्रा वाघ यांनी 2 दिवसांत खुलासा करावा अन्यथा राज्य महिला आयोग एकतर्फी निर्णय देईल असा इशारा आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
यावर उत्तर देताना चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर..! छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार.
