योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यात गैर काय?

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई मध्ये आले होते. या दौऱ्यावर काही नेते मंडळींनी टीका देखील केली. योगी आदित्यनाथ यांचा उत्तरप्रदेश मध्ये एक फिल्म सिटी उभा करण्याचा मानस आहे. त्यांना काही गुंतवणूक त्यांच्या राज्यात घेऊन जाता येईल. मुंबई किंवा महाराष्ट्रात काही गुंतवणूक करता येईल का? या दृष्टीने त्यांचा प्रयत्न चालू आहे. जेणेकरून उत्तरप्रदेश मध्ये उद्योग वाढवता येईल त्यामुळे तेथील लोकांना रोजगार निर्माण होईल व आर्थिक उलाढाल सुरु होईल असा त्यांचा प्रयत्न आहे.

        त्यांच्या या दौऱ्यात काहीच गैर नाही. आपल्या राज्यात कसे उद्योग धंदे वाढतील. तरुणांसाठी नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध होईल. पर्यायाने राज्याचा विकास होईल, त्यासाठीच ते मुंबईत आले. उत्तरप्रदेश मध्ये कशी गुंतवणूक नेता येईल हा त्यांचा प्रयत्न मात्र, योगी आदित्यनाथ मुंबई मध्ये आल्यानंतर काही पोटदुखी सुरु झाली. त्यात महाविकास आघाडीतील नेत्यांना विशेष त्रास होताना दिसत आहे. नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि संजय राऊत तसेच इतर नेते देखील त्यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका करू लागले. योगी महाराष्ट्रातील उद्योग पळवू नका आमच्याकडील फिल्म इंडस्ट्री उत्तरप्रदेश मध्ये पळवून नेण्याचा प्रयत्न योगी यांचा चालू आहे, अशा बऱ्याच प्रकारच्या टीका या नेत्यांनी केल्या. योगी आदित्यनाथ हे त्यांच्या राज्याच्या विकासा संदर्भात ते जर महाराष्ट्रात आले असून त्यांचं स्वागत तुम्हाला करायला जमत नसेल तर त्यांच्यावर विनाकारण टीका करू नये. 

     २०२० मध्ये जेव्हा योगी आदित्यनाथ हे मुंबई मध्ये आले होते त्या वेळी देखील संजय राऊत म्हणाले कि, आमची फिल्म इंडस्ट्री उत्तरप्रदेशात पळवून नेणार संजय राऊत यांनी एक लक्षात घ्यावे की ही वस्तू नाही कि कुणी पळवून घेऊन जाईल. आपल्या सारखी इंडस्ट्री त्यांना त्यांच्या कडे उभी करायची आहे त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी ते मुंबईत आले ह्यात चुकीचं काहीच नाही. ते रोड शो करणार ही बातमी देखील आली. यावर देखील संजय राऊत यांनी आपला विरोध दर्शविला. महाराष्ट्रात कोण येणार? काय करणार? हे महाविकास आघाडीतील नेते ठरवणार का? आणि महाराष्ट्रातील उद्योग तुमचे कधी झाले? महाराष्ट्रातील उद्योग वाढवण्यात तुमचं काय योगदान आहे हे आधी तुम्ही सांगावं. योगी आदित्यनाथ हे जर उद्योजकांना व कलाकारांना भेटत असतील, काही प्रमाणात उद्योग त्यांच्या राज्यात सुरू करता येतील. या गोष्टींची जर माहिती घेत असतील तर त्यात गैर काय ?