संजय राऊत हे सर्वज्ञानी आहेत असंच ते भासवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. संजय राऊत हे सध्या नशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक मधील अनेक पदाधिकारी हे ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेले. हा ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातोय हे खुद्द उद्धव ठाकरे यांना देखील माहित आहे. यासाठी ते नाशिक सभा घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा हा नाशिक दौरा आहे. पक्षाचे झालेले डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी संजय राऊत नाशिक मध्ये गेले आहेत.
नाशिक मध्ये संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यात ते नेहमी प्रमाणे बोलताना दिसले मलाच सगळं कळत हा असा, तो तसा, त्यांचं आता मंत्रिपद जाणार, आम्ही परत सत्तेत येणार, उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री होणार या सगळ्या काल्पनिक गोष्टीच सांगताना राऊत दिसले. आपल्या पक्षातील अनेक महत्वाचे पदाधिकारी व नेते पक्ष सोडून जातायेत. आपल्याला पक्ष वाढवण्याची गरज आहे. पक्षाचं होतं असलेलं डॅमेज कंट्रोल थांबवण्याची गरज असताना आमच्या पक्षाचं काही डॅमेज झालंच नाही तर आम्ही काय कंट्रोल करू असं राऊत म्हणतायेत. राऊत विसरले वाटत कि त्यांच्या पक्षातील १- २ नव्हे तर तब्बल ४० आमदार आणि १३ खासदार आपला पक्ष सोडून गेले आहेत. त्याच सोबत अनेक पदाधिकारी आणि माझी नगरसेवक ह्यांनी पक्ष सोडलाय आणि अजून अनेक लोक पक्ष सोडतायत यावर संजय राऊत म्हणतायेत कचरा गेला.
संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे की पक्षाची पूर्ण वाताहत झाली आहे. पक्षातले अनेक महत्वाचे नेते पक्ष सोडून गेले आहेत. ज्यांचं पक्षासाठी काहीच योगदान नाही ते लोक आता ज्यांनी पक्ष वाढवला अशा लोकांवर बोलत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे कि कचरा गेला कि उरला आहे. शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही असं संजय राऊत आज म्हणाले त्यांनी आपला पक्ष टिकवावा सरकार टिकेल का नाही ते नंतर बघावे.
