तेव्हा राऊत शिवसेनेविराेधात लाेकप्रभेत लेख लिहित हाेते, नारायण राणे यांचा हल्लाबाेल

मुंबई: माझा इतिहास शिवसेना घडवण्याचा आहे. संपवण्याचा नाही. मला पोलिसांनी जबरदस्तीने संरक्षण दिलं, राऊत तेव्हा शिवसेनेत नव्हते. शिवसेनेविरोधात लोकप्रभेत लेख लिहित होते, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.

राऊत यांनी राणे यांना एकटं फिरण्याचे आव्हान दिले हाेते. यावर बाेलताना राणे म्हणाले, कुणाला चॅलेंज देतोय? एकटा फिरा असं मला राऊत चॅलेंज देतो. मी काही सरकारकडे संरक्षण मागितलं नाही. 1990 सालापासून मला संरक्षण आहे. मी ज्यांच्याविरोधात लढलो. त्यात बाहेरचे लोक होते. त्यांच्या विरोधात लढलो म्हणून 90 सालापासून मला संरक्षण दिलं आहे. पोलिसांनी जबरदस्तीने मला संरक्षण दिलं आहे, हे राऊतांना माहीत नाही. कारण राऊत तेव्हा शिवसेनेत नव्हते. शिवसेनेविरोधात लोकप्रभेत लेख लिहित होते.

राणे म्हणाले, एक ना एक दिवस मी राऊत समोर संरक्षण सोडून जाईल, मी एकटाच जाईन. मला काही फरक पडत नाही. माझा इतिहास शिवसेना घडवण्याचा आहे. शिवसेना संपवण्याचा नाहीये. माझ्या वाटेला येऊ नको. तू सांगशील आज तर आज येईल. उद्या म्हणशील तर उद्याही येईल. उद्या मी त्रिपुराला आहे.