अनिल देशमुखांचा न्यायालयाकडे अर्ज ; नागपूरला जाण्यासाठी केला अर्ज

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र देशमुख यांना जामीन मंजूर करताना न्यायालयानं अनेक अटी घातल्या होत्या. मुंबईबाहेर जाण्यासाठी त्यांना न्यायालयाची परवानगी बंधनकारक असेल, ही त्यातली एक प्रमुख अट आहे. आता अनिल देशमुख यांनी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला आहे. नागपूर जिल्ह्यात जाण्यासाठी आपल्याला चार आठवड्यांची परवानगी देण्यात यावी अशी मागणी या अर्जाद्वारे अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे केली आहे. विशेष न्यायालय अनिल देशमुख यांचा अर्ज मान्य करून त्यांना नागपूर जिल्ह्यात जाण्याची परवानगी देणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देशमुख म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी आलो होतो. उच्च न्यायालयाच्या आदेशात ‘अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपप्रकरणी कोणताही सकृतदर्शनी पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे शंभर कोटींच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी देशमुख आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले परवानगी मिळताच आपण प्रथम काटोलला जाणार आहोत असे सांगितले.