नागपूर आणि कोकणातील जागा शिक्षक परिषद लढायची. या दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाला लढू द्याव्या. त्याप्रकारचा आमचा आग्रह होता. कोकणात त्यांनी आमचा आग्रह मान्य केला. शिक्षक परिषदेला आम्ही सांगितले होते की, कदाचित ते नागपुरची जागा ही जिंकू शकणार नाही. येथे भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकते, मात्र त्यांचा आग्रह असल्याने त्यांनी जागा लढवली. आम्ही त्यांना समर्थन दिले पण ते ती जागा निवडून येऊ शकले नाही. निश्चितच आम्हाला त्यांच दु:ख आहे. मुळात आज ज्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुका मध्ये मला अतिशय आनंद आहे. कोकण मतदारसंघाची जागा बऱ्याच कालांतरानंतर भाजपने जिंकली आहे. हा भाजपसाठी मोठा विजय आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन करताना कौतुक केले. महाविकास आघाडीने सत्यजीत तांबे यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, सत्यजीत तांबे यांनी , तीन पक्ष एकत्र येऊनही त्यांच्याविरोधात विजय मिळवला. निवडणूक अपक्ष लढवून जिंकल्याबद्दल सत्यजित तांबेंचं मनापासून अभिनंदन करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मते मिळाली. तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली. अपक्ष उमेदवार असलेले सत्यजित तांबे तब्बल 29 हजार 465 इतक्या मताधिक्याने विजयी झाले.
कोकणात भाजपचे उमेदवार जिंकले. मराठवाड्यातील जागेवर विक्रम काळे यांच्या मागच्या वेळीच्या आणि यावेळीच्या मतांमध्ये फार मोठा फरक आहे. १४ हजारांवर मते भाजपने घेतली आहेत. मागील वेळी भाजप हजार, दीड हजार मते घेतली होती. मराठवाड्यात ती जागा राष्ट्रवादीकडेच होती. महाविकास आघाडीकडे होती, नाशिकची जागाही महाविकास आघाडीकडे होती.
