2014 पासून काँग्रेस सोडणार म्हणून अनेक काँग्रेस नेत्यांची नावे समोर आली. यामध्ये सुरुवातीला समोर नाव आलं ते म्हणजे राधाकृष्ण विखे चर्चेप्रमाणे त्यांनी काँग्रेस सोडली आताच्या राजकारणात पाहिलं तर अशोक चव्हाण यांच्यापासून ते नाना पटोले काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा होत असतात पण एका नावाची मात्र सहसा चर्चा होत नव्हती ते नाव म्हणजे बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरात हे कट्टर काँग्रेसचे नेते आहेत विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून येण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. मोदी लाटेत देखील ते टिकून राहिले त्यामुळे थोरात कधी काँग्रेस सोडतील असे वाटले नव्हते. आता मात्र थोरात यांनी आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे हे फक्त दबावगटाचं राजकारण असून दिल्ली थोरात यांची मनधरणी करेल ही मनधरणी यशस्वी झाली तर नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद जाईल आणि थोरात आपल्या पदावर कायम राहतील. अशी शक्यता असू शकते यापुढे काय होईल ते लवकरच कळेल पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की बाळासाहेब थोरात खरंच इतके तुल्यबळ नेते आहेत का? त्यांच्या जाण्याने पक्षाला मोठा फटका बसू शकतो का? बाळासाहेब थोरात काँग्रेस सोडण्याची वेळ आलीच तर ते कुठे जातील?
बाळासाहेब थोरात यांच्या पक्षांतराची कधी चर्चा होत नाही ते काँग्रेसचे एकनिष्ठ नेते राहिले आहेत. काँग्रेस नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि हीच त्यांची ताकद आहे. ते जातीने मराठा आहेत पण सर्वसमावेशक जातीचं राजकारण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र वर त्यांचा प्रभाव आहे विश्वजीत कदम, बंटी पाटील आणि संग्राम थोपटे अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या तरुण काँग्रेसच्य नेत्यांसोबत त्यांचे विश्वासाचे संबंध आहेत.त्यांच्याकडे आजही ग्रामीण भागाचे नेतृत्व करणारी सहकाराची चावी आहे. या गोष्टी त्यांचं राजकीय महत्त्व वाढवतात अपक्ष म्हणून 1985 साली राजकारणाची सुरुवात करणारे बाळासाहेब थोरात 1990 पासून काँग्रेसचे आमदार आहेत काँग्रेसच्या तिकिटावर ते सात वेळा आमदार झालेले आहेत 1990 पासून ते 2023 पर्यंत त्यांनी एकदाही पक्षांतर्गत बंडाची भाषा केलेली नाही. पक्षांतराच्या चर्चा निर्माण करून आणि राजीनामा अस्त्र असा प्रयोग बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी केला नसल्यामुळे त्यांच्यावर कट्टर काँग्रेसचे असल्याचा शिक्का बसतो.
अशातच बाळासाहेब थोरात जर पक्ष बदलण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यापुढे काही पर्याय असू शकतात त्यांच्याकडे पहिला पर्याय असेल तर तो भाजपचा ते भाजपमध्ये जाऊ शकतील कारण भाजप नेहमीच थोतांसारख्या नेत्यांसाठी पायघड्या घालून तयार असते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा बोलताना स्पष्ट केले की थोरात यांसारख्या वरिष्ठ नेत्यांचा भाजपने नेहमी सन्मान केला. नगर जिल्ह्यातून विखे हे आधीच भाजपमध्ये गेलेले आहेत आता थोरात देखील पक्षात आले तर काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रातून कायमचा हद्दपार करण्यात भाजप यशस्वी होईल. थोरात यांच्या बाजूने बघितले तर थोरात काँग्रेस विचारांना सोडणे कठीण आहे त्यामुळे कदाचित ते राष्ट्रवादी काँग्रेस हा पर्याय देखील निवडू शकतात कारण राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास त्यांना महत्त्वाच्या दोन गोष्टी करता येतील विखेंच्या विरोधात अजून बळ लावण्यास मदत होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे विचार सोबत घेऊन ते पक्ष सोडतील पण राष्ट्रवादी त्यांना काय मिळणार याचा विचार करतील. त्यांच्यापुढे तिसरा पर्याय म्हणजे शिंदे गट कारण शिंदे गटच होत गेल्यानंतर त्यांना अप्रत्यक्षरीत्या भाजपमध्ये जाता येईल अर्थात हे तीन पर्याय किंवा पुन्हा काँग्रेस हे भविष्यात कळेल.
