शेतीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांची भरभराट

देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे शेतमालाला भाव मिळत नाही अशा प्रकारचे आरोप विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून वारंवार केले जातात परंतु या दाव्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सनसनीत उत्तर दिले सुप्रिया सुळे स्वतः शेतकरी आहेत आणि त्यांची मालमत्ता 2009 ते 2019 या कालखंडात सुमारे 90 कोटी ने वाढलेली आहे. सुप्रिया सुळे यांचे यश हे एका यशस्वी शेतकऱ्यांचे यश आहे 2009 ते 2019 या दहा वर्षाच्या कालावधीत सुप्रिया सुळे यांची वाटचाल त्यांची भरभराट त्यांचे यश आणि त्यांची वाढलेली मालमत्ता जर पाहिली तर एकूणच दहा एकरात केली जाणारी वांग्याची शेती त्यांना जबरदस्त नफा देत आहे 2009 मध्ये सुप्रिया सुळेंनी निवडणूक प्रतिज्ञापत्र मध्ये आपली मालमत्ता 52 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं 2014 मध्ये ही मालमत्ता जवळपास दुप्पट झाली 2014 मध्ये आपली मालमत्ता 113 कोटी असल्याचे त्यांनी जाहीर केले 2019 मध्ये ही मालमत्ता 140 कोटी रुपये झाली याचा अर्थ गेल्या दहा वर्षात सुप्रिया सुळे यांची मालमत्ता 89 कोटींनी वाढलेली आहे ही वाढ जवळपास 173 टक्के आहे फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र असा सतत जप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ही भरभराट व यश खरोखरच महाराष्ट्रसाठी अभिमानास्पद आहे.

सुप्रिया सुळे यांचे हे यश एका राजकीय नेत्याचं नसून एका शेतकऱ्याचं आहे जे त्यांनी वांग्याच्या शेतीमधून मिळवल आहे. बचतीसाठी गरिबांचा मार्ग वेगळा असतो मध्यमवर्गीयांचा मार्ग वेगळा असतो तर श्रीमंतांचा मार्ग वेगळाअसतो मात्र सुप्रिया सुळे यांनी या तीनही मार्गांच एकत्रीकरण करून आपल्या सात पिढ्यांची काळजी मिटवली आहे. सुप्रिया सुळे यांनी बँकेच्या ठेवींमध्ये गुंतवणूक केली आहे तसेच विविध कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. बँकेतल्या ठेवी हा मध्यमवर्गीयांचा गुंतवणूक करण्याचा मार्ग आहे तर शेअर्स मधली गुंतवणूक हा श्रीमंतांचा आणि अशा प्रकारची गुंतवणूक करताना सुप्रिया सुळे यांनी मात्र ह्या दोन्ही प्रकारात गुंतवणूक केली तसेच परंपरागत सोने चांदी यांची सुद्धा गुंतवणूक त्यांनी केली आहे

एसोसिएशन डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ने गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या खासदारांची मालमत्ता वाढली आहे. अशा खासदारांची एक यादी जाहीर केली आहे यामधून हा तपशील उघड झाला आहे. शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये दहा वर्षे कृषी मंत्री देखील होते या संपूर्ण कारकिर्दीमध्ये शरद पवार यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या रक्त आले नाहीत तसेच तो विषय देखील सोडवता आला नाही मात्र शरद पवार जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा त्यांना शेतकऱ्यांची आठवण होते शेतकऱ्यांच्या आत्महत्या बद्दल ते भरभरून बोलतात आणि ते सत्ताधाऱ्यांवर आरोप सुद्धा करतात. शरद पवार यांना राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना यश आलं नसलं तरी घरातील एका शेतकऱ्याला यशाच्या मार्गावर नेण्यांमध्ये मात्र ते प्रचंड यशस्वी झालेले आहेत. दहा एकरामध्ये जर शेतकऱ्यांना अफ्फु किंवा गांजाची शेती करण्याची परवानगी दिली तरी शेतकऱ्यांना एवढे उत्पन्न त्यातून भेटणार नाही परंतु जे सामान्य शेतकऱ्याला जमलं नाही ते सुप्रिया सुळे यांनी करून दाखवलं त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या यशाचे कौतुक करणे गरजेचे आहे.

अलीकडेच राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा संपन्न झाली. आणि या यात्रेमध्ये त्यांनी काही आरोप केले त्यामध्ये त्यांनी असं सांगितले की या देशातल्या गरिबांचा आणि शेतकऱ्यांचा पैसा अदानी आणि अंबानी यांच्याकडे जात आहे. अदानी आणि अंबानी श्रीमंत होत आहेत शेतकऱ्यांची परिस्थिती मात्र अजूनही खालावत आहे परंतु सुप्रिया सुळे यांनी दर पाच वर्षांनी आपल्या मालमत्तेचे आकडे जाहीर केले तर राहुल गांधी यांचे दावे सपशेल मोडीत निघतील. शरद पवार हे शेतकरी आहेत त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही स्तराला जाऊ शकतात हाच गुण त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सुद्धा उतरला आहे. शेतीच्या माध्यमातून भरभराट करण्याच एक मोठे उदाहरण सुप्रिया सुळे यांनी देशवासीयां पुढे ठेवलं आहे.