पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील भाषण चांगलेच गाजले या भाषणामध्ये कोणत्या विषयावरती बोलणार कोणत्या मुद्द्यांना हात घालणार याकडे सर्वांचे लक्ष होते. याच कारण म्हणजे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि आदानी यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे याविषयी केलेली भाषण आणि जो काही इंडियन वर्कचा रिपोर्ट आहे त्यामुळे आदानींना भारतामध्ये कशाप्रकारे उद्योग करण्यास फायदा झाला याविषयी राहुल गांधी बोलले होते त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष होतं ते नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आदानी यांचा मुद्दा आणलाच नाही. अदानी हिंडेनबर्ग हे जे काही प्रकरण आहेत याचा मुळात संसदीय कामकाजाची काही संबंध नाही हे नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आणि विरोधकांना एक प्रकारे सांगितलं की तुम्ही जो मुद्दा उपस्थित करताय त्याचा सर्वसामान्यांची काही संबंध नाही. विरोधकांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोललं पाहिजे त्यावर मुद्दे उपस्थित केले पाहिजेत असं असताना अदानींचा मुद्दा उपस्थित करून कोणत्याही पुराव्याशिवाय विषय दुसरीकडे नेणे. कोणत्याही गोष्टीचा संदर्भ किंवा परवा नसता नाही त्यावर बोलणं हेच राहुल गांधी यांचा एकंदरीत भाषणातून दिसून आले. मोदींनी या विषयांवर बोलणं टाळलं बाकी मोदींनी त्यांच्या भाषणात अनेक महत्वाच्या मुद्द्यांमध्ये हात घातला. सुरुवातीला मोदी यांनी सांगितलं ज्यांची योग्यता व पात्रता नाही. त्यांच्याबद्दल काय बोलायचं अर्थात त्यांचा रोख राहुल गांधी यांच्याकडे होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात भारताच्या प्रगती विषयी सांगितलं तसंच विरोधकांच्या निराशी विषयी देखील ते बोलले. पुढे बोलताना मोदी म्हणाले, विरोधक नेहमी ईव्हीएम वर बोलतात एखाद्या राज्यात ते निवडणूक हरले की त्याचे खापर ईव्हीएम वर फोडलं जातं. त्याचप्रमाणे तपास यंत्रणा कशाप्रकारे केंद्र सरकारच्या अधीन झाले आहेत. यावर विरोधक नेहमी बोलत असतात. पुढे बोलताना मोदी म्हणाले 2004 ते 2014 हा जो दहा वर्षांचा काळ होता हा काळ घोटाळ्यांचा काळ होता त्या काळात आपल्याला प्रगती करता आली असती भारताला आणखी पुढे नेता आलं असतं पण सगळा कालावधी आपण घोटाळ्यांमध्ये घालवला. या काळामध्ये आपल्याला काही साध्य करता आले नाही.
2014 नंतर आजतागायत जी काही प्रगती केलेली आहे ती सुद्धा नरेंद्र मोदी यांनी सांगितली. 2014 ते 2024 चा कार्यकाळ हा भारताचा काळ असल्याचे मोदी यांनी सांगितले. भारताची जी प्रतिमा आहे ती जगभरात उजळून निघाली आहे अनेक योजना भारतामध्ये कार्यान्वित झाल्या. त्याचाही उल्लेख मोदी यांनी केला. महिलांच्या बाबतीत अनेक योजना सुरू केल्या व त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांसाठी शौचालय व घर बांधण्याच्या बाबतीतील योजना असतील तसेच संरक्षण दलाच्या बाबतीत आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून शस्त्र बनवणे विमान बनवणे तसेच पाणबुडे बनवणे याचा उल्लेख ही मोदींनी केला भारत आत्मनिर्भर आहे हा विश्वास दहा वर्षात निर्माण झाला आहे. विरोधकांच्या मनात मात्र निराशेची भावना आहे भारत कसा प्रत्येक ठिकाणी मागे पडतोय भारताची कशी अधोगती होत आहे हे सांगण्यात विरोधक व्यस्त आहेत. मोदींनी मात्र विरोधकांच्या टीकेवर जास्त भाषण न करता भारत कसा प्रगतीपथावर आहे हे सांगितले.
