स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणाची सुनावणी सव्वा महिन्याने लांबणीवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण सव्वा महिन्याने लांबणीवर पडले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुका हाेण्याची शक्यता कमी झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयात या प्रकरणावरील पुढील सुनावणी 14 मार्च राेजी हाेणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयात गेल्या आठवड्यात सुनावणी हाेणार हाेती. मात्र त्या दिवशी वेळ संपल्याने सुनावणी हाेऊ शकली नाही. त्यानंतर न्यायालयाने 21 मार्च राेजी सुनावणीची पुढील तारीख दिली हाेती. सुनावणी लवकर घेण्याची मागणी झाल्यामुळे 14 मार्च ही तारीख दिली आहे.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी झाल्यानंतर पुढील सर्व प्रशासकीय कार्यवाही करेपर्यंत जून उजडणार आहे. पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही.
 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका नेमक्या कधी होणार याचे भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे.राज्यातील 92 नगरपरिषदांमध्येसुद्धा ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? महानगरपालिकामधल्या प्रभागपद्धतीच्या बदलांना मान्यता मिळणार का? या बाबतची ही सुनावणी आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी सलग चाैथ्यांदा लांबणीवर पडली आहे.