साेलापूर लाेकसभेवरून जुंपली ; प्रणिती शिंदे म्हणाल्या राेहित पवार पाेरकट


साेलापूर लाेकसभेची जागा काेणी लढवायची यावरून आमदार राेहित पवार आ प्रणिती शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल अशी जाेरदार टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

सोलापूर लोकसभेची जागा लढविण्याबाबत महाविकास आघाडीची  येत्या महिन्या दोन महिन्यात बैठक होईलअसा माझा अंदाज आहे. सोलापूरची जागा काँग्रेसकडेच राहिलं की राष्ट्रवादीने लढवायची हे देखील त्याच बैठकीत ठरेल असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते त्यावरून प्रणिती शिंदे चांगल्याच भडकल्या आहेत कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे. काही जणांमध्ये पोरकटपणा असतो काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल असा हल्लाबाेल प्रणिती शिंदे यांनी केला.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असलेल्या प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू राेहित पवार यांच्यावर कठाेर शब्दांत टीका केल्याने शिंदे – पवार वैमनस्य पुढच्या पिढीतही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात काॅंग्रेसच्या माध्यमातून काम करताना नेहमीच शरद पवार यांना विराेध केला हाेता.