पुलवामा हल्ल्याची ४ वर्षे…! जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी…!

आज संपूर्ण जग जिथे ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यात व्यग्र आहे, तिथेच आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून ओळखला जाणार आहे. आज १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला ४ वर्षे पूर्ण झाली. त्या निर्मम दहशतवादी हल्ल्याने आपल्या देशातील ४० वीर जवानांचा बळी घेतला. आजही तो दिवस आपण सर्व भारतीयांसाठी काळा दिवस म्हणून असणार आहे.


१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे केंद्रीय पोलिस फोर्स म्हणजेच ‘सीआरपीएफ’ च्या ताफ्यावर विस्फोटकांनी भरलेल्या एका गाडीने हल्ला केला आणि आपल्या देशाने काहीही ध्यानी मनी नसताना एकूण ४० वीर जवान एका झटक्यात गमावले. पुढील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेने या बलिदानाचा बदला म्हणून पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केली, ऊरी येथील हल्ल्याचा बदला म्हणून सर्जिकल स्ट्राइक केली, आणि या वीर जवानांना न्याय मिळवून दिला, मात्र आपण जे गमावलं ते गमावलंच. जे गेलंय, ते कधीच परत येणार नाही.



देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर जवानांना श्रद्धांजली अर्पित करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “वीर जवानांचे हे बलिदान भारत कधीच विसरणार नाही. त्यांचे शौर्य देशाला आणखी उन्नत करण्याची प्रेरणा देतं.” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आजच्या दिवशी वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “शौर्यम दक्षम युध्धेय, बलिदान परमो धर्म:| पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीर जवानांना विनम्र अभिवादन | जय हिंद | भारत त्यांचे हे बलिदान कधीच विसरणार नाही.” 


या एका हल्ल्यामुळे आपल्या देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. आणि आपले डोळे देखील उघडले आहेत. त्यामुळे आपण हा हल्ला कधी विसरायचा ही नाही, आणि या हल्ल्यासाठी जबाबदार राष्ट्राला माफ देखील करायचे नाही, अशी भूमिका भारतीयांनी घेतली आहे.