शिंदे सरकारचा मोठा निर्णय ; केंद्राची मोठी योजना महाराष्ट्रात लागू करणार

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली आहे. आजच्या बैठकीत शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांव्यतिरिक्त आरोग्य, अन्न आणि नागरी पुरवठा, जलसंपदा विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने महाराष्ट्रातील शाळांचं पूर्ण स्वरूपच बदलणार आहे. केंद्र सरकारच्या पीएम श्री योजना महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात मंत्री मंडळ बैठकीत चर्चा झाली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांमध्ये खलबते सुरू होती. केंद्र सरकारने सप्टेंबर 2022 रोजी योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशात 14 हजार 597 शाळा सुरू करण्यात येणार आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्वाचे निर्णय –

राज्यात ‘पीएम श्री’ योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार.

धान शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. १ हजार कोटी निधीस मान्यता. ५ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार.

महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता. औषधी, वैद्यकीय उपकरणांची खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत होणार.

पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता. ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार.