राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला होता असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस असत्य बोलून कधीच राजकारण करत नाहीत असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
संजय राऊतांवर महाराष्ट्राने विश्वास ठेवणं बंद केलंय. जेलमध्ये गेले तेव्हापासून ते शिवराळ भाषेत बोलतात. देवेंद्रजींवर बोलण्याइतकी उंची नाही अशा खोचक शब्दांत संजय राऊत यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.आम्हाला कळत होते की मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर त्यांनी आमदार निवडून आणले. षडयंत्र एका दिवसात होत नाही. यामागे टीम आहे त्या टीममध्ये शरद पवार ,उद्धव ठाकरे, संजय राऊत असतील. त्यांनी टीम वर्क म्हणून काम केले असा प्रत्यारोप बावनकुळेंनी केला.
