कल्‍याण – डोंबिवली मतदार संघात अधिक मतांनी निवडून येऊ – अनुराग ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे भाजप पक्षवाढीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात आले होते. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधी पक्ष आणि यूपीए सरकारचा चांगलाच समाचार घेतला. कल्याण – डोंबिवली मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रितरित्या अधिक लक्ष देऊन लढू तसेच पहिल्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येऊ अशी आशा अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेला शपथ विधीवर संजय राऊत यांनी दहा अजूबे दुनियेत असून दोन दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांवर केली होती. यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. यापेक्षा संजय राऊत यांनी केलेल्या घोटाळ्यावर चर्चा केली तर अधिक बरे होईल असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले.

विरोधी पक्ष कायमच सरकार कोसळणार असे मत व्यक्त करत आहेत. यावर प्रत्युत्तर देताना अनुराग ठाकूर यांनी ते नुसतीच आशा धरून बसलेले आहेत. मात्र त्यांची निराशा होणार आहे. हे सरकार कोसळणार नाही तर अधिक मजबुतीने महाराष्ट्राचा विकास करणार आहे अशी प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी दिली.