स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह इतर सहकाऱ्यांना बुलढाणा न्यायालयानं दिलासा दिला आहे. तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नायालायानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला आहे. तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण अकोला न्यायालयीन कोठडीत आहेत. आज संध्याकाळी या सर्वांची सुटका होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम पूर्ण मिळावी तसेच अतिवृष्टीत शेतीचे नुकसान झालेली रक्कम मिळावी यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविकांत तुपकरांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला हाेता. तुपकर यांनी हे आंदाेलन पाेलिसांच्या वेषात येऊन केले हाेते. त्यामुळे एकच गाेंधळ उडाला हाेती. त्यानंतर पाेलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेत न्यायालयात हजर केले हाेते.
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली असल्याचा तुपकरांनी म्हटलं होतं. हजार शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून रस्त्यावर उतरत आहोत. सरकारने वेळोवेळी आमच्यासोबत चर्चा, बैठका केल्या. सरकारने आम्हाला आश्वासनं दिली, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. कापसाला, सोयाबीनला दरवाढ मिळत नाही. 70 ते 80 टक्के सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तरीही सरकार चर्चा करायला तयार नसल्याचं तुपकरांनी सांगितले होतं.
