ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? – केशव उपाध्ये

महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर ट्विट करत निशाणा साधला आहे. ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? असा प्रश्न विचारत त्यांनी सुळेंसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. याआधी सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला होता. त्याला केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुप्रिया सुळेंनी ट्विट करुन म्हटले आहे की, भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळवले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय श्री शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर’ जि. पुणे, हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते.अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पण भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाम राज्याने गुवाहाटीजवळ असणारे पामोही येथील शिवलिंग सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा प्रचार सुरूय केला आहे. हा अतिशय खोडसाळ आणि तथ्यहीन प्रसार आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाच अनेक उद्योग अनेक राज्याच्या बाहेर गेले आहेत. महाराष्ट्र आपल्याकडून थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना असा प्रश्न विचारत त्यांनी सुळेंना टोला लगावला आहे.