सत्तासंघर्षावरील न्यायलयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नियमित सुनावणी घेणार असल्याचे म्हटले आहे. सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मेरीटवर निर्णय व्हावा ही आमची अपेक्षा आहे. सरकार बहुमताचं आहे. कायद्याद्वारे स्थापित झालं आहे. सर्व नियम पाळून सरकार आलं आहे. लोकशाहीत घटना, कायदा आणि नियम आहेत त्यामुळे बहुमताला मोठं महत्त्व आहे. राज्यात बहुमताचं सरकार काम करत आहे. गेल्या ७ महिन्यांपासून लोकांच्या मनातील गरजा आणि आवश्यक बाबींची पूर्तता पूर्ण करत आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात मेरीटवर निर्णय व्हावा. कारण हे कायद्याने स्थापित झालेलं सरकार आहे. आमच्याकडे बहुमत आहे. सरकारला कोणताही धोका नाही,असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकशाहीत बहुमताला खूप महत्व आहे. काही नियम असतात, नियमानुसार आमचे सरकार स्थापन झाले आहे. काही लोकांना वेळकाढूपणा हवा आहे. म्हणून ते सत्तासंघर्षाचं प्रकरण मोठ्या बेंचकडे पाठवण्याची मागणी करत आहेत. प्रकरण ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडं गेलं तर त्यात खूप वेळ जाईल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.