सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला दणका, सात न्यायाधीशांच्या घटनापीठाची मागणी फेटाळली

शिवसेनेतील सत्तासंघर्षावर ठाकरे गटाला मोठा दणका बसला आहे. सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण द्यावेअशी ठाकरे गटाची मागणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने फेटाळली आहे. पुढील सुनावणी २१, २२ फेब्रुवारीला आहे.सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर आज सलग सकाळी साडेदहा वाजता दोन्ही गटाचे वकील न्यायालयात उपस्थित झाले. घटनापीठाकडे दहा मुद्दे आहेत. पण ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जावे, अशी मागणी केली होती.

पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ठाकरे गटाची मागणी नाकारली आहे. पुढील सुनावणी २१, २२ फेब्रुवारीला आहे.आता 21 फेब्रुवारीला सकाळी 10.30 वाजता पुन्हा पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. यावेळी नबाम रेबिया प्रकरणाव्यतिरिक्त विधानसभा अध्यक्षांचे अधिकार 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण, पक्षांतर बंदी कायदा, राज्यघटनेतील 10 व्या परिशिष्टाची व्याप्ती मुद्द्यांवर पुन्हा युक्तिवाद करण्यात येणार आहे.अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाचा संदर्भ या प्रकरणात लागू होतो की नाही? त्यावरुन हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यायचे की नाही? याचा निर्णय येत्या मंगळवारी होणार आहे. मंगळवारी केवळ रेबिया प्रकरणावर ही सुनावणी होणार नाही मुळ केस आणि रेबिया प्रकरणावर एकत्रितपणे सुनावणी होणार आहे.

गुरुवारी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करत कायद्याचा किस पाडण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजू सविस्तर ऐकून घेतल्या आहेत. तीन दिवसापासून विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण, पक्षांतर बंदी कायदा, राज्यघटनेतील 10 व्या परिशिष्टाची व्याप्ती या प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही गटांनी काल जोरदार युक्तिवाद केला. अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाचा संदर्भही दोन्ही गटांकडून देण्यात आला.