महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे राहणार, पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने आज एका मुद्द्यावर निकाल दिला. यामध्ये ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे ठाकरे गटाची पुन्हा निराशा झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता 7 सदस्यीय खंडपीठासमोर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर आता पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार असे सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे.

ठाकरे गटाची मागणी नाकरत सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. सत्तासंघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे राहणार आहे. आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक पानी निकालाचे वाचन केले. यामध्ये नबाम रेबीया प्रकरणाच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नबाम रेबियाचे प्रकरण सात न्यायमूर्तीकडे जाण्यासाठी पात्र नाही, त्यामुळे हे प्रकरण पाच न्यामूर्तींच्या खंडपीठकडे राहणार आहे. 21 आणि 22 फेब्रुवारीला याची नियमित सुनावणी होणार आहे.

महराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचे प्रकरण ज्या गतीने सुप्रीम कोर्टात सुरू आहे. त्यावरून एप्रिल किंवा मे महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील सुनावणी ही मेरिटवर सुरू राहणार आहे.