महाराष्ट्रात सर्वात आधी शरद पवार यांनी गद्दारीचं बीज रोवलं – खा. प्रतापराव जाधव

उद्धव ठाकरे यांना असं वाटत होतं की शरद पवार ब्रह्मदेव आणि कुठल्याही समस्येवर जादूची कांडी फिरवली की समस्या दूर होते.या महाराष्ट्रात सर्वात आधी गद्दारीचं बीज कोणी रोवला असेल तर ते शरद पवार असा गंभीर आरोप खा.प्रतापराव जाधव यांनी शरद पवारांवर केला आहे.तसेच अजित पवार ची सकाळी सात वाजता शपथ घेतली आणि तीन दिवसांनी राजीनामा दिला तर गद्दारी कोण करतय अशी ही टीका यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे.चिखली येथे भाजपा आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे..

जाधव भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना प्रतापराव जाधव म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा त्यांना एवढा अभिमान आला की घराच्या बाहेर ते कधी पडले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सत्ता गाजवत होते अजित पवार. बुलडाण्यात चार आमदार होते. पाचवा मी खासदार होतो. पण पालकमंत्री म्हणून नेमण्यात आलं ते राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराला. सत्ता महाविकास आघाडीची असताना विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजवावी लागली.