उध्दव ठाकरेंना पुढचा धाेका, आदित्य ठाकरेंसह 16 आमदारच ठरणार अपात्र!

निवडणूक आयाेगाने एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेला मान्यता दिल्याने आता उध्दव ठाकरे यांच्यापुढे पुढचा धाेका आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे 16 आमदारच अपात्र ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.निवडणूक आयाेगाने एकनाथ शिंदे यांच्या गटालाच अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे यांनाच मिळाले आहे. त्यामुळे शिंदे यांचाच गट अधिकृत ठरला आहे. राज्यातील सत्तांतराच्या नाट्याच्या वेळी 40 आमदारांनी बंड केले असे म्हटले जात हाेते. आता निवडणूक आयाेगाच्या निकालाप्रमाणे हे बंड नव्हे तर आपाेआपच पक्षाची अधिकृत भूमिका ठरली आहे. त्यामुळे आता या 40 आमदारांशिवाय जे शिवसेनेत राहिले त्यांची भूमिका हिच बंड ठरणार आहे.

अधिकृत शिवसेनेचा पक्षादेश त्यांनी मानला नाही. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई हाेऊ शकते. कारण वेगळा गट करण्यासाठी दाेन तृतियांश बहुमत लागते. ठाकरे गटाकडे केवळ 16 आमदार आहेत. त्यामुळे पक्षांतरासाठी कायदेशिरदृष्टया पक्षांतरासाठी पुरेसी संख्या त्यांच्याकडे नाही. फूटीसाठी आवश्यक सदस्यसंख्या नसल्याने सभागृहात त्यांना शिवसेना म्हणूनच बसावं लागेल,निवडणूक आयाेगाने कसबा आणि चिंचवड या पाेटनिवडणुकांपुरती शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अस्तित्व ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या पाेटनिवडणुकांचा कार्यक्रम संपला की आपाेआपच शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे त्यांना अधिकृत शिवसेनेचा आदेश मानावा लागेल. या पक्षाने काढलेला व्हिपही मान्य करावा लागेल अन्यथा पक्षादेश भंग केला म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई हाेऊ शकते.