भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवलाय. गावस्कर बॉर्डर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सनं विजय मिळवला आहे. दिल्ली कसोटी जिंकत भारतानं सिरिजमधे 2-0 नं आघाडी घेतली आहे. हा भारतीय संघाचा ऐतिहासीक विजय आहे. कारण गेल्या 63 वर्षांपासून दिल्लीत टीम इंडियावर मात करणं कांगारूंना शक्य झालेलं नाही. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा हे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
या सामन्यात भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज केएल राहुल स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोलाचे योगदान देत ३१ धावांची खेळी केली. तर विराट कोहली २० धावा करत माघारी परतला.त्यानंतर श्रेयस अय्यर १२ धावा करत माघारी परतला. मात्र चेतेश्वर पुजाराने एक बाजू सांभाळत ३१ धावांची आणि केएस भरतने २३ धावांची अप्रतिम खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या 115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 4 विकेट गमावून विजय मिळवला. यात 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराची भूमिका महत्त्वाची होती. पुजाने एकबाजू लावून धरली. पुजारा शेवटपर्यंत नाबाद राहिला. टीमला त्याने विजय मिळवून दिला
