उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांचे 167 कोटी रुपये कंत्राटदाराच्या खिशात जाण्यापासून वाचविले

चक्क कार्याधिक असलेल्या कंत्राटदाराला काम देऊन सायकल मार्ग करण्यासाठी मुंबईकरांची 167 कोटी रुपयांची लूट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे टळली. माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाचा आग्रह धरला होता.माहीम किल्ला ते वांद्रे किल्ल्यापर्यंतची साडेतीन किलोमीटरची सायकल मार्गिका आणि चालण्यासाठी उन्नत मार्ग तयार करण्याचे हे काम होते. मुंबई महापालिकेच्या या कामाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली.

माहीम किल्ला ते वांद्रे किल्ला या दरम्यान ३.५९ किमी लांबीची एक सायकल मार्गिका तयार करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने ऑगस्ट २०२१ मध्ये घेतला होता. त्याकरीता निविदाही मागवल्या होत्या.आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार ही सायकल मार्गिका आणि उन्नत मार्ग तयार करण्यात येणार होता. त्याकरीता ऑगस्टमध्ये पूल विभागाने निविदा मागवली होती. धक्कादायक म्हणजे २०१६ ते १९ या कालावधीत ज्या कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाकण्यात आले होते त्याच कंत्राटदाराला या प्रकल्पाचे काम दिले होते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला रस्ते बांधणीसाठी जितका निधी लागतो, त्यापेक्षा अधिक खर्च या प्रकल्पासाठी होणार होता. मुंबईकरांच्या पैशाची लूट होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली.