निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे उद्धव ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निर्णय मला पटलेला नाही. कधी कधी आपल्या न्यायालयाने दिलेल्या निर्णय सुद्धा पटत नाहीत. त्यामुळे हा सुद्धा निर्णय पटलेला नसून आता त्याबद्दल फारस बोलणार नाही.
“निवडणूक आयोग कधीच बरखास्त होऊ शकत नाही कारण, निवडणूक आयोग संविधानानुसार निर्माण झालेला आहे”, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच, “शिंदे गटाला व्हिप काढण्याचा अधिकार आहे तर ते व्हिप काढणारच”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव गटाला चांगलेच सुनावले.
